मुंबई : प्रसिद्ध मॅगझिन फोर्ब्सने दिलेल्या वॄत्तानुसार, २०१५ मध्ये अमिताभ बच्चन हे या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत अभिनेते होते. मीडिया रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये त्यांची संपत्ती ४०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण २४०० कोटी रूपये इतकी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सनुसार त्यांची २०१६ मध्ये नेटवर्थ ४२.५ कोटी डॉलर्स म्हणजेच साधारण २८०० कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. cownetworth.com दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये त्यांची प्रॉपर्टी २४०० कोटी रूपये इतकी आहे. 


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा महानायकाला शोभेल असं काम केलं आहे. स्त्री-पुरूष समानतेला प्राधान्य देऊन त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेताच्या नावावर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली होती. 


मुंबईत ५ बंगले-


अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ हा बंगला चांगलाच प्रसिद्ध आहे. इथेच ते आपल्या परिवारासोबत राहतात. या बंगल्याची किंमत साधारण १६० कोटी रूपये इतकी सांगितली जाते. यासोबतच त्यांचा ‘जलसा’ हा बंगलाही प्रसिद्ध आहे. हा बंगला १०,१२५ स्क्वेअर फूट परिसरात आहे. त्यांचा तिसरा बंगला ‘जनक’ आहे. या दोन्ही बंगल्यांची एकत्र किंमत एकूण ६०० कोटी रूपये इतकी सांगितली जाते. तसेच त्यांनी पॅरिसमध्येही घर खरेदी केले आहे. मुंबईत जूहूमध्ये त्यांची आणखी दोन घरे आहेत. दोन जागाही त्यांनी घेतल्या आहेत ज्यांची किंमत ५० कोटी इतकी आहे. यासोबतच अमिताभ बच्चन यांची रिअर इस्टेट व्हॅल्यू ही ३०० कोटी डॉलर मानली जाते.


दोन कोटीच्या कारचे मालक-


अमिताभ बच्चन यांच्याकडे शानदार कार्सचंही कलेक्शन आहे. बिग बी यांच्याकडे एकूण ११ कार आहेत. ज्यात रोल्स रॉयस, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, लेक्सस पोर्श, फॅटम सारख्या लक्झरी कार्स आहेत. अमिताभ बच्चन हे एका सिनेमासाठी ७ कोटी रूपये आणि एका जाहीरातीसाठी साधारण ५ कोटी रूपये घेतात.


९२ कोटींची एफडी-


अमिताभ बच्चन यांच्याकडे एक महागडं घड्याळही आहे. ज्याची किंमत १.७ कोटी सांगितली जाते. त्यांच्याकडे एक पेंटींग आहे ज्याची किंमत ३.८ कोटी रूपये सांगितली जाते. तसेच भारतीय बॅंकेत त्यांच्या नावाने ९२ कोटीची एक एफडी सुद्धा आहे. तेच यूएसच्या एका बॅंकेत त्यांच्या नावाने ६.६ मिलियन डॉलरची एक एफडी आहे. बॉन्ड्स आणि म्युचूअल फंड्सला मिळून त्यांच्याकडे ६९ कोटींची संपत्ती आहे.