मुंबई : कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी याबाबत लोकांना सतत जागरूक करत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनही सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत. ते आपल्या ट्विटद्वारे सतत कोरोनाव्हायरसबद्दल लोकांना जागरूक करत आहे. वेळोवेळी कोरोना वॉरियर्सला सलाम करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांचे आणखी एक ट्विट व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवरही बरीच प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “फ्रंट लाइन कामगार .. डॉक्टर आणि परिचारिका, सामाजिक योद्धा... मी नतमस्तक आहे.” यासह त्यांनी एक गणपतीचं चित्र देखील शेअर केलं आहे.



अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या छायाचित्रात 'नर्स', 'डॉक्टर', 'सफाई कामगार' आणि 'पोलीस' अशा शब्दांनी बनविलेले भगवान गणेश यांचे चित्र दिसत आहे. अलीकडे एका चाहत्याने अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान होण्याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटलं होतं की, "अरे यार, सकाळी सकाळी शुभ शुभ बोला."