जेव्हा `शोले` चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्रने खरी गोळी झाडली, तेव्हा अमिताभ बच्चन ``बाल-बाल बचे थे``
बीग बी म्हणाले `शोले` कायमच माझ्यासाठी एक स्पेशल सिनेमा आहे
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये होस्ट असलेले अमिताभ बच्चन आपल्या आयुष्याशी संबंधित मनोरंजक किस्से सांगण्यास कधी चुकले नाहीत. अलीकडील भागांमध्येही असंच काहीसं घडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या 'शोले' या सिनेमा संबंधित एक रंजक किस्सा सांगितला आहे.
शोमध्ये आलेला स्पर्धक प्रीत मोहन सिंगने बिग बी यांना सांगितलं की, तो 'शोले' सिनेमाचा चाहता आहे. त्यानंतर प्रीत म्हणाला की, क्लाइमेक्स धर्मेंद्रला आणखी काही दारुगोळा उचलायला हवा होता जेणेकरुन विजय वाचू शकला असता
बाल-बाल बचे थे बिग बी
प्रीतच्या या गोष्टी ऐकून बिग बी त्याला म्हणाले, “जेव्हा आम्ही या सीनचं चित्रीकरण करत होतो तेव्हा धर्मेंद्रजी खाली उभे होते आणि मी टेकडीच्या वर उभा होतो. धरम जी यांना त्यांच्याबरोबर दारूगोळा आणि गोळ्या लवकर लवकर भरुन टाकाच्य़ा होत्या पण जेव्हा जेव्हा त्यांनी गोळ्या उचलल्या तेव्हा त्या गोळ्या खाली पडायच्या.
यामुळे धरमजी भरपूर संतापले होते. चिडून त्यांनी गोळ्या उचलल्या आणि बंदुकीत भरल्या. त्या खऱ्या गोळ्या होत्या. चिडून त्यांनी गोळ्यांनी भरलेली बंदूक उचलली आणि गोळी चालविली. तेव्हा मी टेकडीवर उभा होतो माझ्या कानावरून एक गोळी गेली, ती खरी गोळी होती, परंतु मी वाचलो. या चित्रपटादरम्यान अशा बर्याच घटना घडल्या आणि म्हणूनच 'शोले' कायमच माझ्यासाठी एक स्पेशल आहे
दिग्दर्शकाने चित्रपटाचे क्लायमॅक्स सीन खरे दिसण्यासाठी खऱ्या गोळ्यांचा वापर केला. हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं आहे. 2021 मध्ये या चित्रपटाला 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अमिताभ आणि धर्मेंद्रशिवाय हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान असरानी, जगदीप मुख्य भूमिकेत होते.