मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी कवी आणि आपचे नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बिग बींचे वडिल हरिवंशराय बच्चन यांची 'नीड़ का निर्माण' या कवितेचा व्हिडिओ कुमार विश्वास यांनी युट्यूबवर अपलोड केला. यानंतर कुमार विश्वास यांनी कॉपीराईटचा भंग केल्याचा आरोप करत बिग बींनी कायदेशीर नोटीस पाठवली. याबाबतचं ट्विटही अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेमुळे कुमार विश्वास यांनी तो व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट केल्याचं ट्विट केलं, तसंच सगळ्या कवींच्या कुटुंबियांनी कवितेचं कौतूक केलं, फक्त अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. या कवितेतून झालेली ३२ रुपयांची कमाईही बिग बींना पाठवत आहे, असंही विश्वास या ट्विटमध्ये म्हणाले.



अमिताभ बच्चन आणि कुमार विश्वास यांच्यामधलं हे ट्विटर युद्ध एवढ्यावरच थांबलं नाही. डोकं हे एक अॅप आहे, असं आपल्यातल्या काही लोकांना सांगितलं तर ते डोक्याचा वापर करतील, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं. या ट्विटमध्ये त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा निशाणा कुमार विश्वास यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे. 



याच कवितेवरून बिग बींनी पाठवली नोटीस