`आज घरी जाऊन सूनबाईंना सांगतोच की...`, KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी केलं जाहीर
Amitabh Bachchan and Aishwarya Rai : अमिताभ बच्चन यांनी `कौन बनेगा करोडपती 15` मध्ये सूनबाई ऐश्वर्या रायविषयी अमिताभ बच्चन यांचा खुलासा.
Amitabh Bachchan and Aishwarya Rai : 'कौन बनेगा करोडपति 15' चा नवा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी गुजरातचा एक स्पर्धक आपल्याला हॉटसीटवर पाहायला मिळाला. नेहमीप्रमाणे जेव्हा कोणताही स्पर्धक हा हॉटसीटवर बसतो तेव्हा अमिताभ त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. तेच त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये असं काही झालं. या स्पर्धकाचं नाव प्रतिष्ठा शेट्टी असं आहे. अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे उत्साहानं गेम सुरु करणार त्याआधी त्यांचे वडील मातृभाषेत त्यांना शुभेच्छा देत कन्नडमध्ये बोलतात की 'कुद्रे' याचा अर्थ घोडा असा आहे. याचा अर्थ जाणून बिग बींना देखील आश्चर्य होते. त्यानंतर जे काही झालं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य होईल.
प्रतिष्ठानं सांगितलं की तिचे वडील तिला कुद्रे आणि कट्टे (गाढव) म्हणून हाक मारतात. हे ऐकल्यानंतर आश्चर्य चकीत होतात, पण त्यांनी प्रतिष्ठा आणि तिच्या आई-वडिलांना त्यांना दोन तमिळमधील शब्द शिकवल्यानं आभार मानतात. कारण त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन ते तेलुगू आहे आणि घरी जाऊन तिला सांगू शकतात की ते तमिळमधील दोन शब्द शिकले आहेत. ते म्हणतात की 'हे तेलुगू भाषेत आहे ना, धन्यवाद, आज घरी गेल्यावर मी दोन शब्द बोलू शकेन. कारण सूनबाई ऐश्वर्या राय बच्चन जी आहे ती तेलुगू आहे. तिला तर हे बोलू शकत नाही, पण तिला सांगेन की मी दोन शब्द शिकलो.'
हेही वाचा : Photo : 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'छोटी करीना' गुपचूप अडकली लग्नबंधनात
अमिताभ बच्चन पुढे प्रतिष्ठाच्या वडिलांना म्हणाले की तिला कुद्रे आणि कट्टे म्हणून हाक मारू नका. त्याऐवजी तिला एक टोपण नाव ठेवा. प्रतिष्ठाचे वडील म्हणाले की ते तिला प्रति म्हणून देखील हाक मारतात. बिग बींना हे नाव आवडलं आणि ते म्हणाले की हे नाव तिला शोभणारं देखील आहे. इतकंच नाही तर पुढे प्रतिष्ठानं अमिताभ बच्चन यांच्याकडे तक्रार केली की तिला त्यांची पाळीव मांजर आवडत नाही, कारण तिचे आई-वडील त्या मांजरीवर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करतात. पुढे अमिताभ बच्चन खेळ सुरु करतात आणि ते हळू-हळू पुढे जात असताना प्रतिष्ठाला 12,50,000 च्या प्रश्नावर थांबावं लागतं. त्याचं कारण म्हणजे तेव्हा गेम तिथेच संपतो.