Waheeda Rehman slap to Amitabh Bachchan :  हिंदी चित्रपटसृष्टीतील (entertainment news) 50 आणि 60 च्या दशकातील मुमताज ते आशा पारेख यांनी त्यांचा अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यातील एक नाव होतं ते म्हणजे वहिदा रहमान यांचं...आजही तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. आज त्यांचा वाढदिवस...त्या 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या काळातील टॉपच्या प्रत्येक अभिनेत्यासोबत त्यांनी काम केलं. देव आनंद ते अमितभा बच्चन यांच्यासोबत अनेक (Amitabh Bachchan news)चित्रपटात काम केलं. अमिताभ बच्चन यासोबत त्यांनी अभिषेक बच्चनसोबत पण काम केलं आहे. अनेकांना माहिती नाही पण एकदा वहिदा यांनी बिग बी यांच्या कानाखाली लगावली होती. (Amitabh Bachchan slapped by Waheeda Rehman Trending video) 


आणि म्हणून त्यांनी मारलं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा आहे 1971 मधील...जेव्हा पहिल्यांदाच वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार होते तेव्हा...'रेश्मा और शेरा' या चित्रपटासाठी सुनील दत्त, वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन 
एकत्र आली. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वहिदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांचा कानाखाली मारली. यानंतर सेटवर एकच शांतता पसरली होती. 


झालं असं की, या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अभिनेत्रीला बिग बी यांच्या गालावर थप्पड मारायची होती. त्यावेळी सेटवर सगळे अमिताभ यांना चिडवत होते, की त्या तुम्हाला खूप जोरात मारतील. वहिदा यांनीही बिग बीला इशारा दिला होता की, मी जोरदार मारणार आहे म्हणून...अमिताभ यांना जरा भीतीच वाटतं होती. पण त्या असं काही करणार नाही असा विश्वासही त्यांना होतो...



वहिदा या सेटवर आली...सीनची तयारी झाली आणि वहिदा यांनी अमिताभ यांना मारलं...त्यांनी एवढ्या जोरदार थप्पड मारलं की अख्खा सेटवर आवाज गुंजला होता. अमिताभ आणि वहिदा दोघेही शॉकमध्ये होते. पण बिग बी यांनी गालावर हात ठेवत म्हणाले की, 'अच्छा था'.  



चित्रपटाच्या सेटवर अनेक किस्से असतात. ते नंतर हे अभिनेते आणि अभिनेत्री मुलाखती दरम्यान सांगतात.  वहिदा यांनीही हा किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये (Kapil Sharma Show) सगळ्यांना सांगितला. दरम्यान वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 ला तामिळनाडूमधील चेंगलपट्टूमध्ये झाला. पण बॉलिवूडमध्ये आजही त्यांचा अभिनयाची छाप कायम आहे.