मुंबई : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील गुलमोहर पार्कमध्ये असलेलं त्यांचं 'सोपान' हे घर विकलं आहे. या करारातून त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. हे घर त्यांनी जवळपास 23 कोटींना विकल्याचं सांगितलं जात आहे. या घरात अमिताभ यांची आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन राहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी झालं होतं रजिस्ट्रेशन
ही मालमत्ता नेझोन ग्रुपच्या सीईओ अवनी बदेर यांनी विकत घेतली आहे. जी बच्चन कुटुंबाला गेल्या 35 वर्षांपासून ओळखतात आणि त्याच परिसरात राहतात. एका वृत्तानुसार, 418 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या मालमत्तेची नोंदणी गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी झाली होती.


 एका मुलाखतीमध्ये बोलताना अवनी बदेर म्हणाल्या, की, हे जुनं बांधकाम आहे, जे आम्ही आमच्या गरजेनुसार पाडून पुन्हा तयार करू. आम्ही या भागात अनेक वर्षांपासून राहत आहोत आणि आम्ही खूप दिवसांपासून नवीन मालमत्ता शोधत होतो आणि जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळाली तेव्हा आम्ही लगेच हो म्हटलं.


अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर!
गुलमोहर पार्कमध्ये असलेली ही दुमजली इमारत अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर असल्याचं सांगितलं जातं. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत शिफ्ट होण्यापूर्वी अमिताभ बच्चन आपल्या आई-वडिलांसोबत या घरात राहत होते. काही काळानंतर अमिताभ यांचे आई-वडीलही मुंबईत शिफ्ट झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून हे घर रिकामीच होतं. त्यामुळे ही प्रॉपर्टी बीग बी यांनी विकली असल्याचं म्हटलं जात आहे.


31 करोड़मध्ये खरेदी केलं डुप्लेक्स
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी मुंबईत ५,१८४ स्क्वेअर फुटांचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत 31 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या नोंदणीसाठी, त्यांनी 62 लाख भरले होते, जे 31 कोटींच्या 2 टक्के आहे.