Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती' (KBC 14) हा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनेक भारतीय प्रेक्षक या शोकडे माहितीचा लाईव्ह स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचं 14 वं पर्वास आता सुरूवात झाली. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  स्पर्धकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. याच शोमध्ये एक स्पर्धक रडताना दिसून आली. त्यानंतर संपुर्ण वातावरण भावूक झाल्याचं पहायला मिळालं. (Amitabh Bachchan talk with teacher Shobha Kunwar in Kaun Banega Crorepati 14)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच शोदरम्यान एका स्पर्धकाची भेट घेतली. शोच्या प्रोमोचा (KBC 14 Promo Video) एक व्हिडीओ सध्या प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये राजस्थानमधील शोभा कुंवर नावाच्या शिक्षिकेने सहभाग घेतला. शोभा कुंवर यांना मुख्य संगणकावर बसण्याची संधी मिळाली. शोभा कुंवर यांनी पुढे सुरू ठेवला. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना शोभा यांना अश्रू अनावर झाले आणि भर कार्यक्रमात शोभा कुंवर रडताना दिसून आल्या.


शोभा कुंवर यांची संघर्ष कहाणी -


शोभा कुंवर (Shobha Kunwar) राजस्थानच्या कोटामधील सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी करतात. शोभा फक्त शिकवण्याचं काम करत नाहीत तर शाळेतील गरिब मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील शोभा कुंवर उचलतात. शोभा कुंवर शेकडो गरिब मुलांचं आईप्रमाणे सांभाळ करतात. या सर्व कामाचं श्रेय शोभा 'कौन बनेगा करोडपती' या शोला देतात. केबीसीमुळेच त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली होती, असं देखील शोभा यावेळी म्हणाल्या.


शोभा कुंवर यांची स्टोरी ऐकल्यावर अमिताभ बच्चन देखील भावूक (Amitabh Bachchan emotional) झाले. त्यावेळी बच्चन यांनी गरिब मुलांसाठी दान देण्याचं वचन देखील दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.


काय म्हणाले Amitabh Bachchan ?


मी दोन लोकांना देवाचा दर्जा देतो. एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे शिक्षक. आणि तुम्ही तर दोन्ही आहात, असं अमिताभ बच्च्न म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शोभा कुंवर यांना अश्रू अनावर झाले. सोनी टीव्हीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.



KBC मध्ये नवरात्री स्पेशल-


काही खास कार्यक्रमात KBC मध्ये देखील धमाल दिसून येते. सध्या नवरात्रीच्या मुहूर्तावर एक खास एपिसोड दाखवला जाणार आहे. ज्यामध्ये देशातील विविध 9 राज्यातील 9 खास महिलांना आमंत्रित केलं जाणार आहे. या 9 महिला KBC च्या मंचावर गेम देखील खेळणार आहेत.


आणखी वाचा-


'कौन बनेगा करोडपती’ मध्ये सून ऐश्वर्याच नावं घेताच, संतप्त अमिताभ बच्चन यांची खळबळजनक प्रतिक्रिया