Bollywood Gossip: बॉलिवूडमधील वॉर काही नवीन नाही. शाहरुख-सलमान असो किंवा राज कुमार, राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टारच्या वादाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. पण तुम्हाला माहितीये का सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही कधी काळी त्यांच्या सहकलाकाराला धमकी दिली होती. कोण होती ती अभिनेत्री आणि अमिताभ यांना का राग आला? हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभा बच्चन यांनी आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे अनेक अभिनेत्याचे स्वप्न असते. मात्र, अमिताभ यांचा एक किस्सा चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी त्यांच्या सहकलाकारावर चांगलाच रागवले होते. 1978 साली प्रदर्शित झालेल्या कसमे वादे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आहे. 


1978 साली प्रदर्शित झालेल्या कसमे वादे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणधीर कपूर, राखी गुलजार, अमजद खान, नीतू सिंह, रेखा यांनी भूमिका साकारल्या होता. चित्रपटाच्या सेटवर रेखा यांनी शूटिंगच्या वेळी जोरदार कानशिलात लगावली होती. अमिताभ यांच्या कानशिलात लगावल्यानंतर संपूर्ण सेटवर शांतता पसरली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन हे राखींवर चांगलेच संतापले होते. पण हा चित्रपटातील एक सीन होता. मात्र, राखी यांनी खरे वाटावे अशीच अॅक्शन केल्याने सर्वांनी एकच आश्चर्य व्यक्त केले होते. 


राखी यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अमिताभ यांना कानशिलात लगावल्यानंतर ते खूप नाराज झाले होते. तेव्हा राखीने त्यांना सांगितले होते की, निर्मात्यांनी मागणी केली होती की, कानशिलात लगावण्याचा सीन असा झाला पाहिजे की अमिताभ बच्चन यांनीदेखील आश्चर्यचकित झाले पाहिजेत. त्यामुळं राखी यांनीदेखील पूर्ण जबाबदारीने हा सीन केला. जेव्हा सीन सुरू झाला तेव्हा त्यांनी पूर्ण ताकदीनीशी त्यांना कानशिलात लगावली. 


सेटवर येताच सगळ्यांसमोर जोरदार कानशिलात लगावण्यात आल्याने अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का बसला. राखी यांच्या मते, सीनमध्ये अमिताभ बच्चन यांचाचे एक्सप्रेशन आहे ते खरे आहेत. अमिताभ या प्रसंगानंतर खूप चिडले होते. हे ठिक नाहीये, मी सोडणार नाही, बदला घेईन, अशी धमकी त्यांनी दिली. अमिताभ चिडलेले होते ते पाहून निर्मात्यांनी त्यांना सगळं काही समजावून सांगितले. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा राखी यांना याप्रसंगाबाबत सतत चिडवून दाखवत होते.  व मस्करीत येता-जाता बदला घेण्याची धमकी देत होते. 


1978 मध्ये अमिताभ बच्चन यांचे एकूण 6 चित्रपट प्रदर्शित झाले होते. विशेष म्हणजे, 6 चित्रपटही खूप चालले. यात गंगा की सौंगध, कसमे वादे, बेशर्म, त्रिशूल, डॉन, मुक्कदर का सिकंदर हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले. मात्र, मुक्कदर का सिकंदर त्या वर्षाचा सर्वात हिट चित्रपट होता. 


कसमे वादे चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी 4 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. बॉक्स ऑफ इंडियाकडून या चित्रपटाला सेमी हिट घोषित करण्यात आले होते.