मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे स्मृतिदीन आहे. त्यानिमित्ताने मंंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो व पुरस्कार प्रदान केला जातो. 34 वर्षांपासून 212 व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच 2022 पासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे 'लता दीनाना मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात येत आहे. 


24 एप्रिल 2022रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 24 एप्रिल रोजी 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यंदा 2024 मध्ये हा पुरस्कार बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. 


पाहा पुरस्कारांची यादी 


ए आर रहेमान यांना मास्टर दिनानाथ मंगशेकर पुरस्कार, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


पद्मविभूषण अमिताभ बच्च्न यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 


 गालिब नाटक (उत्कृष्ट नाटककार 2023-24) ला मोहन वाघ पुरस्कार जाहीर 


 दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल (समाजसेवा) संस्थेला आनंदमयी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


 श्रीमती मंजिरी फडके प्रदीर्घ साहित्य सेवेकरता वाग्विलासीनी पुरस्कार जाहीर 


 रुपकुमार राठोड व्होकल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


भाउ तोरसेकर यांना राजकीय पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.  


मास्टर दिनानाथ मंगेशकर थिएटर  अतुल परचुरे यांनाही पुरस्कार जाहीर 


मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा