मुंबई : बॉलिवूड अभिनेता कादर खान यांची तब्येत थोडी नाजूक आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निमोनियाने कादर खान रूग्णालयात दाखल केलं आहे. तसेच त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच कादर खान हे प्रोग्रेसिव सुपरान्यूक्लियर पाल्सी नावाच्या आजाराने त्रस्त असल्याचं देखील कळलं आहे. या आजारामुळे ते कुणाशीच बोलू शकत नाही. 


त्यांच्या या आजारपणावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत भावनिक ट्वीट केलं आहे. 


या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की, मी कादर खान यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो खूप जुना असून त्यांच्या आठवणी यात दडल्या आहेत.




कादर खान 'मेरी आवाज सुनो', 'अंगार', 'दरिया दिल', 'राजा बाबू', 'आंखे', 'कुली नंबर 1', 'हीरो नंबर 1' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या मस्करीच्या स्वभावामुळे कादर खान सगळ्यांचे लाडके आहेत.