मुंबई : 'कोन बनेगा करोडपती' या प्रश्न उत्तरांच्या खेळात अनेकांची स्वप्न पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमात आजपर्यंत आपल्या बुद्धिचातुर्याने प्रश्नांची उत्तर देणाऱ्या मोजक्याच मंडळींना करोडपती होण्याचा बहुमान मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिग बींनी स्पर्धकाला फक्त प्रश्नचं विचारला नाही, तर कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा आणि कोणत्या नाही. यासाठी एक उत्तम उदाहरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोन बनेगा करोडपती' चौदावा सीजन (KBC Season 14) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा नवीन प्रोमो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसलेल्या महिलेला प्रश्न विचारत आहेत. गुड्डी असे या मुलीचे नाव आहे. बिग बींनी गुड्डीला प्रश्न केला-


यातील कोणाकडे GPS टेक्नॉलॉजी आहे? 
A.टाईपरायटर 
B.टेलिव्हिजन 
C.सॅटेलाईट 
D.2000 ची नोट 



याप्रश्नाचं उत्तर देनाता गुड्डी यांनी D या पर्यायाची निवड केली. गुड्डी यांनी उत्तर दिल्यानंतर बिग बींनी उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. तेव्हा पुढे गुड्डी म्हणाल्या 'तुम्ही मस्करी करताय ना... मी हे उत्तर टीव्ही चॅनेलला ऐकलं आहे.'


यावर अमिताभ बच्चन म्हणतात, 'ज्ञान मिळवणं आवश्यक आहे पण ते ज्ञान किती खरं आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे.' सध्या बिग बींनी प्रत्येकाला दिलेला हा संदेश तुफान व्हायरल होत आहे.