मुंबई : संभाजी राजांचा जीवनप्रवास झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. या मालिकेतून डॉ अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. आता याच मालिकेतून डॉ कोल्हे यांच्या मुलीने देखील छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे आद्या कोल्हे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे. कोल्हे यांची दुसरी पिढी देखील या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आद्याने मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारत आहे. सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली.


आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे. त्यामुळे आद्यापेक्षा जास्त तिचे बाबा म्हणजेच अमोल कोल्हे अधिक उत्सुक आहे.



स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे या मालिकेतील बालकलाकार. मालिकेतील सगळ्याच बालकलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्या आहेत. 



‘कालपर्यंत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते… एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, हावभाव, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे ‘हे चुकलं’ असं बिनधास्त सांगू शकतो,’ अशी पोस्ट त्याने फेसबुकवर लिहिली.


दरम्यान, आद्याच्या अभिनयाबाबत अमोल कोल्हे उत्सुक असून, बाप-लेकीची ही जोडी प्रेक्षकांना कशी वाटते हे लवकरच समजणार आहे. 


अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी आद्याच्या या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली होती. आद्याची ही पहिलीच मालिका असून तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे.