मुंबई :  सध्या सगळीकडेच 'गदर 2' हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा चांगलाच दबदबा आहे. मात्र या सिनेमातील एक सीन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. खरंतर या सिनेमातील एक सीन पाहून प्रेक्षक थक्क होत आहेत. कारण सिनेमात दिसणाराहा सीन काही सेकंदांचा असला तरी तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया थक्क करणाऱ्या होत्या. कारण त्यांना या सीनची अपेक्षा नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गदर 2 या सिनेमात चक्क दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्यावर एक सीन चित्रित करण्यात आला आहे, परंतु इतक्या वर्षांनंतर या चित्रपटात अमरीश पुरी यांना कसं दाखवण्यात आलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर आता आम्ही तुम्हाला याच संबधित सांगणार आहोत. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल आणि हा सीन देखील पाहिला असेल तर तुम्हाला हे कसं झालं याबाबत प्रश्न पडला असेल.  तर आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांना CGI च्या मदतीने तयार करण्यात आलं आहे.


CGI म्हणजे "कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी", आणि हे तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे जे ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्यासाठी वापरलं जातं. CGI व्हिडिओ गेम, चित्रपट, दूरदर्शन शो, डिझाइन आणि इतर मल्टीमीडिया प्रोजेक्टमध्ये वापरलं जातं. 


CGI तंत्रज्ञान या प्रकारे कार्य करते:


मॉडेलिंग (Modeling) : पहिली स्टेप म्हणजे 3D मॉडेलमध्ये ऑब्जेक्ट्स डिझाइन करणं. हे मॉडेल विविध आकारांचं आणि गोल सेट करण्यासाठी असू शकतं आणि सामान्य भूमिती तंत्र वापरून बनवलं जातं.  


टेक्स्चरिंग (Texturing) : मॉडेल्सना ते वास्तविक जीवनासारखं दिसण्यासाठी टेक्सचर दिले जातात. हे टेक्स्चर्स  सहसा  इमेज स्वरूपात असतात.


रिगिंग (Rigging) :  मॉडेल्सला गतिशील बनवण्यासाठी त्याला एक स्केलेटन सिस्टम दिलं जातं. या सिस्टीमची मदतीने डिज़ाइनर्स मॉडलला विविध बोटांनी आणि आरामात हलणाऱ्या हिस्स्यांसोबत जोडलं जाऊ शकतं.


एनिमेशन (Animation) : मॉडेल्सना गतिशील बनवल्यानंतर त्यांना  माहिती आणि हालचाल देण्यासाठी अॅनिमेशन केलं जातं. हे वास्तविक चालणारे आणि काम करणारे मॉडेल्स बनवतं.   


रेंडरिंग (Rendering) : एनिमेशन आणि मॉडल्सचं अंतिम रूप तयार करण्यासाठी रेडरिंग केलं जातं. ही प्रक्रिया ग्राफिक्स चित्रीत आणि विविध शैली आणि इफेक्ट जोडण्यात मदत करते.


CGI टेकनिकचा उपयोग आजकाल चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात आणि व्हिडिओ गेममध्ये वापरलं जातं.