मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने आरजे अनमोलसोबतच्या तिच्या गुपचूप केलेल्या लग्नाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. या कपलला एक मुलगा देखील आहे आणि ते त्यांचं सुखी वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. अमृता राव आणि आरजे अनमोल त्यांच्या यूट्यूब चॅनल 'कपल ऑफ थिंग्स' वर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित मनोरंजक भागांची सिरीज शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत आता नुकत्याच शेअर केलेल्या भागात या कपलने त्यांचा हनीमून अल्बम शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुपचुप केलं लग्न
अमृता आणि अनमोल यांनी खुलासा केला होता की, त्यांनी 15 मे 2016 ला नाही तर 2014 मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. बरेच दिवस या कपलने त्यांचं नातं मीडियापासून दूर ठेवलं. मात्र, लग्नाच्या घोषणेनंतर हे कपल त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करतात.


हनीमूनला दाखवला सिझलिंग अंदाज
अमृता रावने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा पती अनमोलसोबतचा हनिमूनचा एक जबरदस्त फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अमृता सुंदर स्ट्रॅपलेस जंम्पसूटमध्ये पोज देताना दिसत आहे. तर अनमोल शर्टलेस आहे आणि त्याने पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. हा फोटो शेअर करत अमृताने तिच्या व्लॉगबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "#CoupleOfThings च्या नवीन एपिसोडमधील आमच्या हनीमूनमधील 50 नं पाहिलेले  फोटो."




अमृता आणि आरजे अनमोल यांनी त्यांचा व्लॉगही यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये त्यांनी आपल्या हनिमूनचे एकामागून एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना दाखवले आहेत. तसंच हे कपलदेखील हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांच्याबद्दल सांगत आहेत.