मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. कधी ट्विट तर कधी एखाद्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण आहे संगीत... अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर गाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत असतात.



आता अमृता फडणवीस यांचं 'शिव तांडव स्त्रोतम' लवकरचं सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. 
 
आता त्यांनी त्यांच्या आगामी 'शिव तांडव स्त्रोतम' गाण्याचं पोस्टर रिलीज केले आहे. अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं 24 फेब्रुवारी 2022 रोजी सोशल मीडियाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.