मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एक गायिका म्हणून ओळख परिचित झाली आहे.  त्यांचा बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलाल्या अल्बम चांगलाच चर्चेत राहिला होता. आता त्या 'चांदण्या बिलोरी कळ्या' हे गाणं गाणार आहेत. त्यामूळे हे गाणं कस असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. 


आवाज ही ओळख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘जय गंगाजल’ चित्रपटातील ‘सब धन माटी’या दोन गाण्यांनी अमृता फडणवीस यांची गायिका म्हणून ओळख निर्माण झाली. गायन विश्वातील पदार्पणाची गाणी त्यांच्या आवाजाचा चाहता वर्गही निर्माण झाला आहे.


त्यानंतर आता नव्या प्रोजेक्टमधून त्यांचा आवाज चाहत्यांना ऐकता येणार आहे. 


चांदणं बिलोरी कळ्या


'परी हू मै' या सिनेमाची निर्मिती सध्या सुरू आहे. यामध्ये ‘चांदणं बिलोरी कळ्या’हे गाण अमृता फडणवीस गाणार आहेत.


शब्द आणि संगीत


अभिषेक खणकर यांनी आपल्या खास शैलीत या गाण्याला शब्दांची जोड दिली असून समीर सप्तरकर यांनी संगीत दिले आहे. 


आई लेकीतील संवाद


आई-लेकीत असणारा हळवा संवाद या गाण्यातून समोर येतो.