मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेला आणि अजूनही लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी.


माहेरची साडीचा सिक्वल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. चित्रपटातील अलका कुबल यांच्या भुमिकेत कोण दिसणार, अशी चर्चा  सुरू असताना यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकरचं नाव पुढे येत आहे. त्याचबरोबर तिचं या भुमिकेसाठी योग्य असल्याचे खुद्द अलका कुबल यांचे म्हणणे आहे.


१२ कोटींची कमाई


या ब्लॉकबस्टर चित्रपटात अलका कुबल, विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर हे कलाकर होते. 'माहेरची साडी' हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटानं तब्बल १२ कोटींची कमाई केली होती.


प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता


लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाच्या सिक्वलबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्याचबरोबर ग्लॅमरस अमृता 'माहेरच्या साडी'त दिसणार का, हे पाहणं औत्सुकाचे ठरणार आहे.