Amruta Subhash : 'मासिक पाळी...' आजही अनेकदा हा विषय जेव्हाजेव्हा चर्चेत येतो तेव्हातेव्हा त्याच्याबाबत कित्येकजण खुलेपणानं व्यक्त होणं टाळतात. तर, सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळीबाबत सांगताना अनेक महिलाही संकोचतात. हा न्यूनगंड दूर व्हायला अजून बराच काळ जाईल, असं अनेकांचं म्हणणं आणि सद्यस्थिती पाहता त्यात गैर असं काहीच नाही. कलाजगतामध्ये मात्र याच मासिक पाळीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. अभिनेत्रींच्या आरोग्यालाही आता चित्रीकरणादरम्यान विचारात घेतलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिनं नुकतंच एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळं ही बाब स्पष्ट झाली. अनुराग कश्यपच्या  Sacred Games season 2 या सीरिजमध्ये अमृतानं पहिल्यांदाच एक sex scene साकारला होता. त्यादरम्यान दृश्याच्या चित्रीकरणावेळी तो सोबतच्या कलाकारंना कितपत विचारात घेतो हे त्याच्या एकाच कृतीतून अमृताच्या लक्षात आलं. हल्लीच प्रदर्शित झालेल्या Lust Stories 2 सीरिजमुळं चर्चेत आलेल्या अमृतानं सांगितलेला तो किस्सा सध्या बराच चर्चेत आला आहे. 


मासिक पाळी कधीये तुझी?  


अमृतानं सेक्रेड गेम्स 2 मध्ये रॉ एजंट कुसूम देवीची भूमिका साकारली होती. गणेश गायतोंडे अर्थात नवाझसोबत तिनं या सीरिजमध्ये तगडी भूमिका साकारली होती. याच सीरिजदरम्यान तिनं पहिल्यांदाच इंटिमेट सीनच्या चित्रीकरणाचा अनुभव घेतला होता. दिग्दर्शक म्हणून अनुरागनं यावेळी तिच्यासाठी अनेक गोष्टी इतक्या सोप्या करून दिल्या, की तिसुद्धा भारावली. 


चित्रीकरणाच्या आधी अनुरागनं आपल्याला मासिक पाळीच्या तारखाही विचारल्याचं तिनं सांगितलं. याबाबत सांगताना अमृता म्हणाली, 'माझा पहिलाच सेक्स सीन अनुरागच्या दिग्दर्शनात होता. इथं तो पुरुष आहे किंवा महिला आहे हा मुद्दाच नव्हता. तो अतिशय संवेनशील होता, इतका की त्यानं तुमचे पिरियड्स कोणत्या दिवशी आहेत? असा प्रश्न करत त्या आदुबाजूला चित्रीकरण न ठेवण्यास सहकाऱ्यांना सांगितलं.'


हेसुद्धा पाहा : Harry Potter आणि त्याच्यासोबतची पात्र भारतीय पेहरावात कशी दिसतील? 


मासिक पाळीदरम्यान काम करणार तुम्ही? या काळजीपोटी विचारलेल्या त्याच्या प्रश्नानं अमृता भारावली. त्याच्या संवेदनशील आणि जबाबदारपणानं तिचं मन जिंकलं. अमृतानं साकारलेली कुसूमदेवी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. आश्चर्याची बाब म्हणजे अमृतानं साकारलेली ही भूमिका पुस्तकामध्ये एका पुरुषाच्या दृष्टीकोनातून लिहिण्यात आली होती. पण, सीरिजच्या वेळी सेक्रेड गेम्सच्या निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांच्या टीमनं ती भूमिका एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून लिहिली आणि अमृताला ती साकारण्याची संधीगी मिळाली.