एमी जॅक्सनचा `या` व्यक्तीसोबत गुपचुप साखरपुडा
कोण आहे ही व्यक्ती
मुंबई : अक्षय कुमारच्या अनेक सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलेल्या एमी जॅक्सनने साखरपुडा केला आहे. एमीने 1 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड जॉर्ज पनइओतूसोबत साखरपुडा केला आहे.
एमीने याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियावरून करून दिली आहे. एमीचा होणारा नवरा जॉर्ज ब्रिटनच्या अरबपती कुटुंबातून आहे.
नुकतीच एमी जॅक्शन अक्षय कुमार आणि रजनीकांतसोबत सिनेमा 2.0 मध्ये दिसली होती. इंस्टाग्रामवर एमीने रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटो एमी आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.
1 जानेवारी 2019 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने साखरपुडा केला आहे. एमीने लिहिलं आहे की, 'नवीन वर्षात अॅडवेंचरची सुरूवात. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला जगातील सर्वात जास्त आनंद दिल्यामुळे धन्यवाद....'
एमीच्या या पोस्टवर अभिनेत्री सोफी चौधरी आणि एली अवरामसोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एमीचा नवरा अरबपती असून ब्रिटीश प्रॉपर्टी टायकूनचा मुलगा आहे. जॉर्ज अनेक लक्झरी हॉटेलच्या सिरीज चालवत आहे. एमी जॅक्सन 2015 पासून जॉर्जसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
जॉर्ज भरपूर श्रीमंत असून त्याने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला सुरूवात केली. त्याचे वडिल 3600 करोड रुपयांचे मालक आहे.