मुंबई :  OTT च्या जगात, आता रोज एकापेक्षा एक  वेब सिरीज येत आहेत, काही कथा थ्रिल असतात. तर काही कॉमेडी असतात तर काही रोमँन्टिक आहेत. . यापैकी बरेच हिंदीमध्ये डब केलेले असतात. तर काही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अशाच एका वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा शेवटपर्यंत मनात रोमांच निर्माण करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कथा क्राइम आणि मिस्ट्री थ्रिलर आहे आणि ती मूळतः तेलुगु भाषेत बनलेली आहे. 11th Hour असे या वेब सिरीजचे नाव आहे. ही सिरीज तमिळमध्ये डब करून रिलीजही करण्यात आली आहे. 


या वेब सीरिजमध्ये 11 तासांची  मीटिंग आणि त्याचा परिणाम दाखवण्यात आला आहे. वेब सिरीजच्या मध्यभागी आश्चर्यकारक ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. ही वेब सिरीज 'aha originals'वर तुम्ही पाहू शकता. यामध्ये तमन्ना आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण अरात्रिका रेड्डीच्या भूमिकेत आहे. पण आरात्रिका राजकीय षड्यंत्राचा बळी ठरते आणि यानंतर ती दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचते.
 
कंपनीला दिवाळखोरीतून वाचवायचं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत ९ हजार कोटी रुपये इम्पीरियल बँकेत जमा करावे लागतील. यासाठी अरात्रिकाचा एक्स पती सिद्धार्थ सिंग यांच्याबरोबर राजवर्धन राठौर, इम्पीरियल बँकेचे अध्यक्ष सुंदर दास आणि दुबईचे शेख राजकुमार सादिक यांनी अरात्रिकासमोर प्रस्ताव ठेवला. पण ती तो नाकारते. या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं आणि काय रहस्य उलगडतात हे मनोरंजक आहे.


अभिनेत्री तमन्ना भाटियाने  या वेब सिरीजद्वारे ओटीटी जगात पदार्पण केलं आहे. 11th Hour ही तेलुगु सिनेमाची सर्वात मोठी वेब सिरीज असल्याचं म्हटलं जाते आणि ती एप्रिल 2021 मध्ये रिलीज होणार होती. तमन्ना व्यतिरिक्त यात वामसी कृष्णा, अतिथ अरुण, रोशनी प्रकाश, प्रिया बॅनर्जी, रवि वर्मा आणि श्रीकांत अय्यंगार सारखे कलाकार दिसले होते.


 तमन्ना भाटियाची ही वेब सिरीज अहा ओरिजिनलवर पाहता येईल. या वेब सिरीजचे डब व्हर्जन हिंदीमध्ये उपलब्ध नसले तरी. पण ती तुम्हाला इंग्रजी सबटायटल्ससह अहा वर पाहता येईल.