Anand Mahindra Gadar 2: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हीट ठरला आहे. 22 वर्षांपुर्वी आलेल्या Gadar या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 40 कोटींचा गल्ला पार करत आता दुसऱ्या दिवशी चक्क 80 कोटींच्या पुढे गल्ला भरला आहे. OMG 2 या चित्रपटालाही Gadar 2 नं मागे टाकले आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे. सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा हे या चित्रपटात प्रमुख भुमिकेतून दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाची गाणीही हीट झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खान, नाना पाटेकर अशा अनेकांनी सनी देओलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातून आता आनंद महिंद्रा यांनीही सनी देओलला शुभेच्छा दिल्या असून त्याच्यासाठी आणि चित्रपटासाठी एक खास गिफ्टही दिलं आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया ही नक्की कोणती भेटवस्तू आहे?  


आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटरवरून चांगलेच सक्रिय असतात. त्यावरून विविध व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत असतात. हे व्हिडीओज इतके अर्थपुर्ण आणि विविधांगी असतात. की आपल्यालाही यातून नवीन माहिती आणि चार ज्ञानाच्या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे त्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. अशातच आता सनी देओल यांच्या 'गदर 2' या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सनी देओल यांच्या Gadar 2 या चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. या दिलेल्या हटके शुभेच्छा पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. 


हेही वाचा : ''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल



यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''देशात Gadar 2 चित्रपटाचा सर्वत्र उत्साह आहे. तेव्हा यावेळी मेगा स्टार सनी देओल यांच्या आयकॉनिक माचो ट्रक ड्रायव्हर  तारा सिंगची एन्ट्री होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सर्वत्र सणाचा मोहोल आहे.'' यावेळी @mahindratruckandBus या ट्विटर हॅण्डवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी आनंद महिंद्रा यांचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे. याखाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी सनी देओलनंही त्यांचे आभार मानले आहेत.