Anant Ambani Pre Wedding celebrity stay Venue Video : गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांचा लहाण मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत. अशात त्यांच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं, त्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी तिथे हजेरी लावली आहे. फक्त सेलिब्रिटी नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाले. अशात आलेल्या इतक्या पाहूण्यांना राहण्यासाठी कशी सोय करण्यात आली हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असताना आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ भारतीय बॅडमिनटनपटू सायना नेहवालनं शेअर केला आहे.  तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायनानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला सायना ही पाहुण्यांसाठी राहण्यासाठी असलेल्या ठिकाणाचा बाहेरचा परिसर दाखवते. त्यानंतर ती त्या टेन्टमध्ये जाऊन लिविंग रूम दाखवते. तिथे सोफा सेट असतो. त्यानंतर त्याच्या पुढे असलेला बेडरूम दाखवते त्याशिवाय त्यांच्यासाठी एक ड्रेसिंग रुम दाखते. बाहेरून पाहता हा टेन्ट खूप लहाण असल्याचं वाटतं मात्र, तसं नसून आतही फार मोठा आहे. त्याशिवाय त्याला एक आलिशान आणि एस्थेटिक टच मिळाला आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत सायनानं कॅप्शन दिलं की परफेक्ट अंबानी वेडिंग'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोणत्या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी?


जामनगरमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.त्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, हॉलिवूडची लोकप्रिय गायिका रिहाना, बेसिस्ट ॲडम ब्लॅक स्टोन या सेलिब्रिटींनी. याशिवाय बॉलिवूड कलाकारांविषयी बोलायचं झालं तर शाहरुख खान हा संपूर्ण कुटुंबासोबत पोहोचला होता. सलमान खान रणवीर सिंग दीपिका पदुकोण श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांनी देखील हजेरी लावली होती. त्याशिवाय सैफ अली खान हा त्याच्या चारही मुलांसोबत आणि पत्नी करीना कपूरसोबत दिसला. 


हेही वाचा : अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानानं घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं मानधन!


गुरुवारी गावकऱ्यांना अंबानी कुटुंबाने पंगतीत वाढलं जेवण


प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू होण्याआधी म्हणजेच गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी संपूर्ण कुटुंबासोबत जामनगरच्या ग्रामीण लोकांना स्वतःच्या हातानं जेवण वाढलं होतं. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.