Ananya Pandey: अनन्या पांडे सध्या तिच्या 'लायगर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट पॅन इंडिया म्हणजेच संपुर्ण भारतात प्रदर्शित होतो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या पांडे भारत दौऱ्यावर आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा तेलुगूतील ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यासाठी या चित्रपटाची संपुर्ण टीम ही हैद्राबादला पोहोचली होती. त्यासाठी त्यांचे हैद्राबाद येथे जंगी स्वागत झाले होते. अनन्याने तेव्हा लाल साडी घातली होती. या ट्रेलर लॉन्चला करन जोहर आणि रणवीर सिंगही उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अनन्या तिच्या 'लायगर'च्या प्रमोशनसाठी मुंबईत आहे. तेव्हा आपल्या या आगामी बीग बजेट चित्रपटाच्या निमित्ताने तिने मुंबईतील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने घातलेला ब्लॅक कट ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली. ड्रेसची रचना फारच ओपन असल्याने तिला oops moment ला सामोरे जावे लागले. काही ट्रोलर्सने असेही म्हटले आहे की उर्फीने असे कपडे घातले तर ते ट्रोलिंग आणि अनन्याने घातले तर तो ट्रेण्ड?


बॉलिवूडची युवा स्टार अनन्या पांडे यामुळेच सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा लुक व्हायरल होताच तिच्यावर ट्रोलर्सने ट्रोल करायला सुरूवात केली. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात ती आपला ड्रेस सांभाळत सांभाळत मीडियाला सामोरी जाताना दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. 


अनन्याच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर अनन्या पांडे ब्लॅक फ्रंट कट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिने वेव्ही हेअरस्टाईल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. या आउटफिटमध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही अनन्या पांडेच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 



अनन्या पांडेने अल्पावधीतच इंडस्ट्रीत तिने एक खास स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या फॅशन आणि स्टाइलने इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड सेट करते. 'लिगर' या चित्रपटात अनन्या आणि विजय देवरकोंडा सोबत दिग्गज बॉक्सर माइक टायसनचा खास कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.