ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, सोमवारी पुन्हा हजर राहण्याचे आदेश
ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर आता एनसीबीनं आणखी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : क्रूझ शिप ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर आता एनसीबीनं आणखी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत आर्यन खानच्या चॅटमधून अनन्य़ा पांडेचं नाव समोर आल्यामुळे तिलाही एनसीबीनं समन्स बजावलं आहे. (Ananya Pandey ARYAN KHAN NCB DRUGS CASE) काल दोन तास चौकशी केल्यानंतर आज देखील अनन्याला या प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.
अनन्या पांडेची NCBकार्यालयात सुरू असलेली चौकशी संपलीय. आज सकाळी 11वाजता अनन्याला NCBकार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.. मात्र अनन्या उशिरा म्हणजे अडीच वाजता NCB कार्यालयात पोहोचली. तिची चार तास कसून चौकशी झाली. दरम्यान अभिनेता अरमान कोहली याचा मित्र बाबूभाई काचवाला याचीही एनसीबी चौकशी करतेय. आता अनन्याला सोमवारी पुन्हा NCBकार्यालयात हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अनन्या गुरुवारी जवळपास दोन तासांसाठी एनसीबी कार्यालयात होती. जिथं तिची चौकशी करण्यात आली. चौकशीच्या नव्या सत्रातून नेमकी काय माहिती समोर आली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनन्याची चौकशी समीर वानखेडे यांनी केली. यावेळी तपास अधिकारी वीवी सिंहसुद्धा उपस्थित होते. शिवाय एक महिला अधिकारीही तेथे उपस्थित होत्या.
चॅट्सची माहिती देत NCB ने अनन्या पांडेला चौकशी करता बोलावलं. त्यामधून अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलताना दिसत आहेत. हे संभाषण या दोघांमध्येच झालं आहे. त्यामुळे आता अनन्या पांडेच्या संकटात वाढ होणार असल्याचं म्हटंलं जात आहे.