लॉस एंजेलिस : यंदाचा OSCARS 2019  सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कलाविश्वात सर्वांत मानाचा पुरस्कार म्हणून 'ऑस्कर पुरस्कार' ओळखला जातो. आज लॉस ऐंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर २०१९ सोहळा पार पडला. ९१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विविध विभागातील नामांकन सादर केली गेली. यंदाच्या ९१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'ची घोषणा करण्यात आली आहे. Best Actor in a Leading Role या विभागातील पुरस्कारासाठी रामी मालेक (rami malek) याच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 'बोहेमियन रॅपसडी' या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रामी मालेकला पुरस्कार देण्यात आला आहे. 'Bohemian Rhapsody' हा चित्रपट दिवंगत गायक फ्रेड्री मर्करी यांच्या जीवनावर आधारित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामी मालेकने हा पुरस्कार त्याच्या आईला समर्पित केला आहे. तसंच पुरस्कार घेताना त्याने त्याच्या दिवंगत वडिलांचेही आभार मानत जे जिथे कुठे असतील तिथून माझं यश बघत असून मला आशिर्वाद देत असल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी संपूर्ण कुटुंबाचे आभार मानत रामीने चित्रपटातील त्याच्या संपूर्ण टीमचेही आभार मानले आहेत. 




याआधी ७६व्या गोल्डन गोल्ब २०१९च्या पुरस्कार सोहळ्यातही रामी मालेकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 'बोहेमियन रॅपसडी' याच चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी त्याला 'गोल्डन गोल्ब २०१९'च्या पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं होतं.