मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. इश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी बिदरी कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईश्वर बिदरी यांनी १९७१ साली ‘कारवा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘हत्यार’, ‘अंगार’, ‘इन्साफ’, ‘अंदाज अपना अपना’, ‘बॉर्डर’, ‘अंदाज’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली. सिनेमॅटोग्राफीसोबतच त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. इश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.