मुंबई : अंगीरा धर... बँड बाजारा बारात फेम अभिनेत्री. जी अभिनेत्री आपल्या जाहिरातीमुळे खूप चर्चेत आली. तिच्या चॉकलेट खाण्याच्या खास अंदाजावर संपूर्ण देशाने भरभरून प्रेम केलं. ही अभिनेत्री अंगीरा धर लग्नबंधनात अडकली आहे. (Angira Dhar and Anand Tiwari look stunning in traditional wedding outfits) दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्यासोबत 30 एप्रिल रोजी लग्न झालं. मात्र 25 जूनला अंगीराने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'30 एप्रिल 2021 रोजी आनंद आणि मी कुटुंब आणि अगदी जवळच्या मित्र परिवराच्या उपस्थितीत माझ्या मैत्रीला लग्नामध्ये रुपांतरीत केलंय. आमच्या आजूबाजूची परिस्थिती जशी अनलॉक होतेय तसा आम्ही हा आनंद तुमच्यासोबत शेअर केला आहे.'



ज्या मुलीच्या चॉकलेट खाण्याच्या अंदाजावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकले आनंद 'लव पर स्क्वायर फीट'मध्ये अंगीराचे दिग्दर्शक होते. 2018 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमात अपोझिटला विकी कौशल होता.



यासोबतच अंगीराला कमांडो 3 मध्ये भूमिका साकारली. अंगीरा आनंद यांच्या लग्नाचे फोटो पाहून हा अतिशय खासगी सोहळा असल्याचं दिसून येतं. 30 एप्रिल रोजी लॉकडाऊन असल्यामुळे हा सोहळा अतिशय खासगी पद्धतीने साजरा केला.



आनंद तिवारी आणि अंगिरा धर यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसह सेलेब्सही या दोघांचं अभिनंदन करत आहेत.