Sonam Kapoor Baby Shower: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाची. कारण लंडनमध्ये सर्वात महागडे डोहाळे जेवण केल्यानंतर आता सोनम लवकरच मुंबईत डोहाळे जेवण करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर तिने तिच्या फॅमिलीला, फेन्ड्स आणि बीएफएफ्सना तिच्या डोहाळे जेवणासाठी आमंत्रित केले आहे. त्याचसोबतच सगळी तयारीही झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा यांच्याकडे लवकरच एका छोट्या पाहुण्याचं स्वागत होणार आहे. त्यातून या बातमीमुळे अनिल कपूरही लवकरच आजोबा होणार आहेत त्यामुळे तेही भलतेच खुश आहेत. सध्या तेही ही आनंदाची गोष्ट बाहेरच्या कुठल्याही कार्यक्रमात व्यक्त करताना थांबत नाही त्यांना ही गोष्ट सगळीकडे शेअर करायला आवडते आणि तसे ते जाहीरपणे सांगतातही. त्यामुळे मी आता तरूण नाही मी पण म्हातारा झालोय आणि आता लवकरच आजोबा होणार आहे, हेही ते आवर्जून सांगतात. 


सोनमच्या कुटुंबाने मुंबईत तिच्यासाठी बेबी शॉवर फंक्शन आयोजित करण्याचे प्लॅनिंग केले आहे ज्यात खुद्द तिची बीएफएफ मसाबा गुप्ता सगळ्या सभारंभाचे एकटीने आयोजन करणार असल्याचे बोलले जाते आहे. अभिनेत्री सोनम कपूर तिची बहीण रिया कपूरसोबत नुकतीच लंडनहून मुंबईला परतली आहे.


आमंत्रण होऊनही आणि सगळी तयारी होऊनही उत्साहात असलेली सोनम मात्र आता चांगलीच नाराज झाली आहे कारण अनिल कपूर यांनी सोनमचे डोहाळे जेवणच कॅन्सल केले आहे. या फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येणार होते. ज्यात आलिया, कतरिना आणि करिनाचाही समावेश होता. पण आता अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांनी हा फंक्शन कॅन्सल केले आहे.


सोनम कपूरच्या पहिल्या गुड न्यूजमुळे संपूर्ण कपूर कुटुंबात आनंदाची लाट उसळली आहे. सोनमने नुकतेच लंडनमध्ये बेबी शॉवरचा इन्व्हेंट केला होता. त्यात तिचे मुंबईला तिच्या मावशीच्या घरी बांद्राच्या बंगल्यात बेबी शॉवर ठरले होते. त्यातून त्यांनी पाहूण्यांनाही खास आमंत्रण केले होते. पाहुण्यांना खास डिझाईन केलेल्या भेटवस्तूही निमंत्रण पत्रिकांसोबत पाठवण्यात आल्या. सोनमची आई बहीण कविता सिंग हिच्या बांद्रा येथील घरी रविवारी 17 जुलै रोजी बेबी शॉवर होणार होते. 


परंतु त्यात एक खोट चक्क अनिल कपूर यांनी घातला. मुंबईतील वाढत्या कोविडच्या केसेसमुळे सोनम कपूरच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे की तिचे डोहाळे जेवण होणार नाही. व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे कपूर कुटुंब खूप चिंतेत असून सोनम आणि तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल त्यांना कोविडचा धोका नको आहे.


स्वरा भास्कर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, मसाबा, राणी मुखर्जी, जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, कपूर, मोहित मारवाह, अंशुला कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सोनम कपूरच्या बेबीला हजेरी लावणार होते.