Anil Kapoor Miffed on Boney Kapoor : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचे मोठी भाऊ बोनी कपूर या दोन्ही भावांचं नातं किती सुंदर आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. चित्रपटसृष्टीत नेहमीच या दोन्ही भावांमध्ये असलेल्या नात्याचं उदाहरण देतात. बोनी कपूर यांनी आता एक असा खुलासा केला आहे जे कळल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य झालं आहे. बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला की त्यांचा छोटा भाऊ अभिनेता अनिल कपूर त्यांच्यावर नाराज आहे. बोनी कपूर यांनी या गोष्टीचं कारण देखील सांगितलं. तर ते म्हणाले की ते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नव्हते. त्याचं कारण हे बोनी कपूर यांच्या बॅनर खाली असलेला 'नो एंट्री 2' हा चित्रपट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोनी कपूर यांनी याचं कारण सांगत त्यांचा आगामी 'नो एंट्री 2' हा चित्रपट आहे. त्या चित्रपटावरुनच दोन्ही भावांमध्ये वाद सुरु आहे. बोनी कपूर यांनी झूमला दिलेल्या या मुलाखतीत सांगितलं की त्यांचे छोटे भाऊ अनिल कपूर जे या चित्रपटाच्या पहिल्या भागात होते. त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आहे की ते त्याच्या दुसऱ्या भागात नसणार आहे. याविषयी सांगत बोनी कपूर म्हणाले की "मी 'नो-एन्ट्री'च्या सिक्वलविषयी अनिलला सांगणार त्याआधीच ती बातमी लीक झाली आणि तो खूप नाराज झाला आहे. मला याविषयी माहिती आहे की त्याला या सीक्वलचा भाग व्हायची खूप इच्छा होती. मात्र, यात त्याच्यासाठी अशी कोणती भूमिका नव्हती. मला त्याला ही गोष्ट सांगायची होती, त्याला समजवायची होती. पण माझा भाऊ माझ्याशी नीट बोलत नाही. मी आशा करतो की हे सगळं लवकर ठीक होईल." 



हेही वाचा : 'ओम शांति ओम' मधील स्टंट दरम्यान विकी कौशलच्या वडिलांना येणार होता हार्ट अटॅक! म्हणाले...


दरम्यान, बोनी कपूर यांच्या 'नो-एन्ट्री' चित्रपटाचा सिक्वल हा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या चित्रपटात 10 अभिनेत्री दिसणार आहेत. त्याशिवाय सगळी नवी स्टार कास्ट असेल असं म्हटलं जातं. तर सगळे कलाकार हे यंग जनरेशमधील असतील. त्यात वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्या कास्ट करण्यात आलं आहे. मात्र, ही गोष्ट अनिल कपूर यांना आवडली नाही. त्यामुळे त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाले आहेत.