जॅकी श्राफ यांनी का लगावली होती Anil Kapoor यांच्या 17 वेळा कानशिलात
अनिल कपूर यांना का 17 वेळा कानशिलात खावी लागली होती. काय आहे यामागचं कारण?
मुंबई : फिल्मी दुनियेत असे अनेक कलाकार आहेत जे परफेक्ट सीनसाठी ओळखले जातात. अनेक दिग्गज कलाकारांनी खूप संघर्ष करत मोठं यश मिळवलं आहे. ज्यामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) यांचं देखील नाव आहे. बॉलिवूडचा (Bollywood) लखन म्हणजेच अनिल कपूर यांचा फिटनेस पाहून आजही अनेकांना विश्वास होत नाही. हा अभिनेता अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आला. शूटिंगदरम्यान आपले सीन परफेक्ट करण्यासाठी ते नेहमीच आग्रही दिसतात. आज असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोता. (why jackie shroff slapped anil kapoor 17 times)
चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (vidhu vinod chopra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर (jackie shroff and anil kapoor) यांच्या भूमिका असलेल्या 1989 मध्ये आलेल्या 'परिंदा' (Parinda Movie) चित्रपटातील एक दृश्य लोकांसोबत शेअर केला आहे.
या चित्रपटात किशन म्हणजेच जॅकी श्रॉफला (jackie shroff) त्याचा धाकटा भाऊ करण म्हणजेच अनिल कपूरला कानाखाली मारणारा सीन शूट करायचा होता. पहिल्याच शॉटमध्ये हा सीन ओके होता. पण अनिल कपूर त्यांच्या एक्सप्रेशनवर खूश नव्हते आणि त्यांना वाटले की ते याहूनही चांगले एक्सप्रेशन देऊ शकतात. त्यामुळे अनिल कपूरने हा सीन पुन्हा करायचा निर्णय घेतला.
जॅकी श्रॉफने अनिल कपूरला पुन्हा कानशिलात मारली, पण यावेळीही अनिलला त्याच्या एक्सप्रेशनमध्ये काय करायचंय ते दिसलं नाही. पुन्हा एकदा हा सीन रिटेक करण्यात आला आणि असे करताना जॅकी श्रॉफने अनिल कपूरला तब्बल 17 वेळा कानशिलात लगावली होती.
जॅकी श्रॉफ (jackie shroff) आणि अनिल कपूर (Anil kapoor) यांनी 10 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि अनेक सुपरहिट चित्रपटही दिले आहेत. ज्यामध्ये 'परिंदा' चित्रपटाव्यतिरिक्त, 'राम लखन' हा चित्रपट सर्वात प्रमुख चित्रपटांपैकी एक मानला जातो.