COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांची जोडी 'फन्ने खा' सिनेमांत दिसणार आहे. या सिनेमातील सगळी गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. आज गायक मोहम्मद रफी यांची 38 वी पुण्यतिथी. त्यांचच 'बदन पे सितारे लपेटे हुए..'  हे गाणं अनिल कपूरने रिलीज केलं आहे. जुनं गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं होतं तर नवं गाणं सोनू निगमने गायलं आहे. हे गाणं 1969 मध्ये रिलीज झालेल्या 'प्रिन्स' सिनेमात अभिनेत्री वैजयंतीमाला आणि अभिनेता शम्मी कपूरवर चित्रित आहे. सिनेमा फन्ने खांमध्ये अनिल कपूर थिरकताना दिसत आहे. 


या सिनेमांत अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बऱ्याचवर्षांनी एकत्र येणार आहे. आपल्या या नव्या गाण्यावर अनिल कपूर थिरकताना दिसत आहे. अनिल कपूरने याबाबत ट्विट देखील केलं आहे. 



या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हे माझं ऑल टाईम फेव्हरेट साँग आहे. बदन पे सितारे हे गाणं माझा मित्र सोनू निगमने गायलं आहे. या गाण्यातून फन्ने खान या सिनेमाच्या टीमने मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.