कंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत
Anil Kapoor On Kangana Ranaut: सोशल मीडियावर सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
Anil Kapoor Viral Video: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा चॅट शो लोकप्रिय आहे. या चॅट शोमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबतच दिग्गज व्यक्ती हजेरी लावत असतात. तर, कॉफि विथ करण हा कार्यक्रम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात कलाकारांनी केलेल्या वक्तव्यांमुळं त्यांना टिकेचा सामना करावा लागला होता. आता सोशल मीडियावर अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. (Anil Kapoor On Kangana Ranaut)
करणच्या कॉफी विथ करणमध्ये अनिल कपूर, कंगना रणौत आणि संजय दत्त यांनी हजेरी लावली होती. यावेळी करणने अनिल कपूर यांना एक प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी कंगनाचे नाव घेत उत्तर दिलं आहे. मात्र, नेटकऱ्यांना अनिल कपूर यांनी दिलेले उत्तर आवडलं नाहीये. सोशल मीडियावर त्यांना जबरदस्त ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर करण जोहरवरदेखील टीका केली जात आहे.
क्लिक करुन पाहा व्हिडिओ
करण जोहरने अनिल कपूर यांना एक प्रश्न विचारला आहे, जर त्यांना त्यांच्या पत्नीला सोडून दुसऱ्या एखाद्या महिलेला निवडायचे असेल तर ती कोण असेल? असा प्रश्न करणने अनिल यांना केला होता. त्याचबरोबर हॉलिवूड अभिनेत्रींचे नाव घेता येणार नाही, अशी अटही ठेवली. करणचा प्रश्न ऐकताच अनिल कपूर यांनी वेळ न दवडता कंगनाचे नाव घेतले. तसंच, ती छान दिसते, असं म्हणत तिचं कौतुकही केले. मात्र सोशल मीडियावर या उत्तरामुळं अनिल कपूर यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत करण जोहर व अनिल कपूरवर टीका केली आहे. कंगना यांचा इतका द्वेश का करते हे आता समजलं, असं एकाने म्हटलं आहे. तर, दिवसेंदिवस हे लोक पातळी सोडून वागत आहेत, असंही एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, व्हायरल होणारा व्हिडिओ कॉफी विथ करण सीझन ३मधील आहे. याच शोदरम्यान करणने कंगनाला प्लास्टिक सर्जरीबद्दलही प्रश्न विचारला आहे. तु कधी प्लास्टिक सर्जरी केली आहेस का? असं करणने कंगनाला विचारलं. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून नेटकरीही भारावले आहेत. कंगना म्हणते की, मी कधीच सर्जरी केली नाहीये. मी दक्षिण भारतातून आलीये आणि तिथल्या मुलींना ही दैवी देणगीच लाभलेली असते, असं कंगनाने म्हटलं आहे.