...म्हणून अनिल कपूरची मुलं त्याला `या` नावाने हाक मारतात!
बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कूल आहे.
मुंबई : बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता अनिल कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कूल आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील एका खाजगी आयुष्यातील एका किस्सा शेअर केला.
तो म्हणाला की, "अर्जुन कपूर, रणबीर कपूर आणि वरुण धवन यांना मी त्यांच्या जन्मापासून ओळखतोय. माझे त्यांच्याशी अत्यंत खेळीमेळीचे नाते आहे. अर्जुन तर माझ्या डोळ्यांसमोरच लहानाचा मोठा झाला. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचे चुलत भावंडांसोबत असलेले खास नाते. बरेचदा चुलत भावंडं वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात, त्यामुळे त्यांच्यात तितके घट्ट संबंध प्रस्थापित होत नाहीत. पण ही सगळी चुलत भावंडं जुहू, लोखंडवाला, वांद्रे आणि पाली हिलला जवळपास राहत असल्यामुळे सगळे एकत्र भेटतात. मात्र त्यात मी एकटाच त्यांचा काका असतो." पण खास गोष्ट ही की, मला कोणीच काका म्हणून हाक मारत नाही. सर्वजण माझा एके म्हणतात. त्यामुळे माझी मुलं देखील मला 'एके' म्हणतात. तर माझ्या बायकोला सुनीताला 'सोनू' म्हणतात.
पुढे तो म्हणतो की, "मी माझ्या मुलांसोबत आणि पुतण्यांसोबत एका मित्रासारखा वागतो आणि वागत आलो आहे. अर्जुनसोबत मुबारकांमध्ये काम करण्याचा अनुभव फार सुरेख होता. पण जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांसोबतच काम करता नात्यात कडवटपणा येऊ शकतो. पण याची जाणीव असल्याने आम्ही विशेष सावधगिरी बाळगतो."