मुंबई : काही दिवसांपुर्वी 'आशिकी 3' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात कार्तिकची वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाबद्दलच्या सतत कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येत असतात. आता या सिनेमाबाबत अजून एक अशीच बातमी समोर येत आहे. नुकतीच 'आशिकी 3'ची घोषणा करण्यात आली आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता त्याच्यासोबत अजून एका अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. जी कार्तिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात कार्तिकसोबत कोणती हिरोईन असेल याचा अंदाज लोक सतत बांधत आहेत. तारा सुतारियापासून ते दीपिका पदुकोण, क्रिती सेनॉनपर्यंतच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. मात्र निर्मात्यांनी या अफवांचे स्पष्ट खंडन केलं. आता  'आशिकी 3'च्या यादीत डीमरीला कास्ट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तृप्तीचे चाहते भलतेच खूश दिसत आहेत. तृप्ती डिमरीने 'अॅनिमल' चित्रपटात झोया नावाची छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र तिची ही भूमिका इतकी गाजली की, तिला अनेक सिनेमाच्या ऑफर येवू लागल्या. 


याचबरोबर तृप्ती  'अ‍ॅनिमल'च्या सिक्वेलमध्ये ती रणबीरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'आशिकी 3'मध्ये कार्तिक आणि तृप्तीने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. तृप्ती सिनेमात येण्याआधी ती एक यूट्यूबर होती. तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यामध्ये ती 'प्यार का पंचनामा 2' मधील कार्तिक आर्यनच्या प्रसिद्ध मोनोलॉगला उत्तर देताना दिसत आहे.


'आशिकी 3'चे शूटिंग 2024 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे. 'एनिमल'नंतर तृप्ती डिमरी 'मेरे मेहबूब मेरे सनम' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सारख्या चित्रपटात दिसणार आहे. रोमँटिक कॉमेडी जॉनरमध्ये आपलं स्थान मजबूत केल्यानंतर कार्तिक आता वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची निवड करत आहे.  कबीर खानच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये तो दिसणार आहे. जे स्पोर्ट्स ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तो हंसल मेहताच्या 'कॅप्टन इंडिया'मध्ये काम करणार आहे. ज्यामध्ये त्याची भूमिका पायलटची असेल. 'भूल भुलैया 3' पुन्हा येणार आहे. आणि त्यानंतर 'आशिकी 3' ही त्याच्या यादित आहे. 


'आशिकी 3'चे दिग्दर्शन अनुराग बसू करत आहेत. 'आशिकी 3' ही फ्रेंचायझी चार्टबस्टर गाण्यांसाठी ओळखली जाते. त्यामुळे सध्या देशातील अनेक संगीतकारांच्या सहकार्याने चित्रपटाचे संगीत तयार करण्यात निर्माते व्यस्त आहेत. 'आशिकी 3' 2025 मध्ये रिलीज होऊ शकतो.