Animal Team Reply to Javed Akhtar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' ची वर्ल्डवाइड 898 कोटींची कमाई केली आहे. 2023 मध्ये हिट झालेल्या चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटाला काही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं तर काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला नापसंती दर्शवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. तर दिग्गज लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी या चित्रपटाचं हिट होणं हे धोकादायक आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता 'ॲनिमल' च्या टीमनं प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर यांनी या चित्रपटातील रणबीर आणि तृप्ती डिमरीचा सीन आणि कबीर सिंगच्या कानशिलात मारण्याच्या सीनचा उल्लेख केला होता. तर त्यानंतर आता 'ॲनिमल' च्या टीमनं लिहिलं की त्यांचं सगळं आर्टफॉर्म खोटं आहे. इतकंच नाही तर जावेद अख्तर यांना देखील टॅग केलं आहे. त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की 'तुमच्या क्षमतेचा लेखक एक कपलचा (झोया आणि रणविजय) विश्वासघात समजू शकत नसेल तर तुमचे संपूर्ण ऑर्टफॉर्म हे खोटं आहे. एखाद्या स्त्रीनं (प्रेमाच्या नावावर पुरुषानं फसवलेलं आणि मुर्ख बनवलं) 'माझे बुट चाट' असे म्हटले असते तर तुम्ही लोकांनी त्याला स्त्रीवाद म्हणत उत्सव साजरा केला असता. प्रेमात लैंगिकत राजकारण आणू नका. फक्त त्यांना प्रेमी म्हणा. प्रेमीनं धोका दिला आणि खोटं म्हटलं. प्रेमीनं म्हटलं माझं बुट चाट.'



जावेद अख्तर यांनी अजिंठा-वेरुळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्लमध्ये एक स्पीकर आमंत्रित केलं होतं. या दरम्यान, ते म्हणाले की 'जर कोणता चित्रपट आहे, ज्यात एक पुरुष कोणत्या महिलेला त्याचं बूट चाटायला सांगत असेल किंवा कोणता पुरुष बोलतो की महिलेला कानशिलात लगावणं योग्य आहे. तर चित्रपट सुपरहिट आहे, तर हे धोकादायक आहे.'


हेही वाचा : जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!


दरम्यान, नुकतीच 'ॲनिमल' ची सक्सेस पार्टी झाली. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, रश्मिका आणि आलियाच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले. तर तृप्ती डिमरी ही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर रणबीरसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.