जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!

Sara Tendulkar with Janhvi Kapoor s boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली सारा तेंडुलकर! फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Jan 7, 2024, 04:30 PM IST
जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!  title=
(Photo Credit : Social Media)

Sara Tendulkar with Janhvi Kapoor s boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करणच्या 8' मध्ये बहिणीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी जान्हवी तिची बहीण खुशी कपूरसोबत पोहोचली होती. तर या शोमध्ये जान्हवीनं तिच्या खासगी आयुष्यापासून प्रोफेशनल आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा केल्या आहेत. त्याशिवाय तिनं तिच्या लव्ह लाइफवर देखील मोठा खुलासा केला होता. तिनं काही न बोलता शिखर पहाडियासोबतच्या तिच्या रिलेशनशिपवर मोहर लावली आहे. या सगळ्यात शिखरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये शिखर पहाडिया हा लोकप्रिय स्टारकिड सारा तेंडुलकरसोबत दिसत आहे. शिखर आणि सारा हे एकत्र त्यांच्या मित्राच्या पार्चीत गेल्याचे पाहायला मिळते. तिथून बाहेर पडतानाचा त्यांचा एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ बॉलिवूड सोसायटी या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तर सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाहनं देखील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सारा आणि शिखर हे गाडीत बसल्यानंतर एकमेकांशी हसत गप्पा मारताना दिसत आहेत. 

या सगळ्यात नेटकरी हे मजेशीर कमेंट्स करत आहेत. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत जान्हवी कपूर आणि शुभमन गिलचा उल्लेख केला. तर काहींनी त्या दोघांच्या नावावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'शुभमन आणि जान्हवी एका कोपऱ्यात रडत असतील' अशी कमेंट केली. दुसरा नेटकरी म्हणाला, 'शुभमन आणि जान्हवीनं हा व्हिडीओ पाहिलाना मग झालं.'

हेही वाचा : पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'

त्याचं कारण म्हणजे सारा आणि शुभमन गिल हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. तर शिखर आणि जान्हवी हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होतं. मात्र, जान्हवीनं नुकतंच तिच्या रिलेशनशिपला अधिकृत केलं आहे. जान्हवी अनेकदा शिखर पहाडियासोबत तिरुपती बालाजीला जाऊन वेंकटेश यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचते. त्यामुळे ते दोघं लवकरच लग्न करू शकतात असं अनेकांना वाटतं. आता नक्की पुढे काय होणार हे ते दोघंचं सांगू शकतात.