मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. सध्या शनाया आणि गुरुला धडा शिकवण्याचा चंग राधिकाने बांधल्यामुळे मालिका अधिकच रंजक झाली आहे. मालिकेत दिवाळीचे सेलिब्रेशन नसले तरी खऱ्या आयुष्यात मात्र सेलिब्रिटींनी दिवाळी दणक्यात साजरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील राधिका म्हणजेच अनिता दाते-केळकर हिने देखील उत्साहात दिवाळी साजरी केली. त्यात जर गिफ्ट्स मिळाले तर आनंदात नक्कीच भर पडते. अनिता मात्र हक्कने आई-वडील आणि नवऱ्याकडे गिफ्ट मागते. पाडव्यानिमित्त अनिताने नवऱ्याकडे खास गिफ्ट मागितले आहे. ते म्हणजे कॉस्मेटीक्सने भरलेली मेकअप व्हॅनिटी. हे गिफ्ट आपल्याला नवऱ्याकडून मिळणारच असा विश्वास तिला आहे. 


पतीकडून हक्काने गिफ्ट मागणारी अनिता पतीलाही विशेष गिफ्ट देणार आहे. आपण कधीच एकमेंकांना कपडे, सोनं अशा भेटवस्तू देत नाहीत असं अनिताने सांगितले. चिन्मयची वाचनाची आवड लक्षात घेऊन त्याला सर्व दिवाळी अंक एकत्र करुन भेट देणार असल्याचे अनिताने सांगितले आहे.


फारळाबद्दल सांगताना अनिता म्हणते, "दिवाळीत घरोघरी फराळ बनत असला तरी मला शूटींगच्या व्यस्त शेड्युलमधून फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे फराळाचे काम आई किंवा सासू करतात."