अंकिता लोखंडेकडे गुडन्यूज; Photo शेअर करत काय म्हणतेय एकदा पाहाच
अंकितानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकितानं छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून केली होती. या मालिकेत अर्चना ही भूमिका अंकितानं साकारली होती. या भूमिकेनं अंकिताला करिअरच्या शिखरावर पोहोचवलं होतं. या मालिकेमून अंकिता घराघरात पोहोचली. त्यानंतर अंकितानं काही चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारली. आता सगळ्यांची लाडकी अंकिता मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
खरंतर अंकितानं 2019 मध्ये कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटात सहायक भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अंकितानं 'बागी 3' मध्येही सहायक भूमिका साकारली. आता ती 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अंकिताला रणदीप हुड्डासोबत (Randeep Hooda) कास्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : 'दृश्यम 2' विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार 'ही' भूमिका
अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत स्वत:चा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अंकितानं तिच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. फोटोमध्ये अंकिता रेट्रो लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. तिने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी ही बातमी जाहीर करण्याची प्रतिक्षा करत होते! स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) या माझ्या पहिल्या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारणार आहे. मी हा प्रवास सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.
अंकितानं ही पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'संदीप सिंगशिवाय हे शक्य होणार नाही. तुम्ही माझे सर्वात मोठे समर्थक आणि सर्वोत्तम मित्र आहात ज्याची आशा करता येईल. निर्माते साहेब, तुमचा प्रवास कौतुकास्पद आहे. या संधीबद्दल आनंद पंडित सर तुमचे खूप खूप आभार आणि शेवटी मी रणदीप हुडा यांना सांगू इच्छिते की तुम्ही सर्वात प्रतिभावान अभिनेता आहात आणि आता आमचे दिग्दर्शक. (ankita lokhande bollywood debut in lead role swatantraveer savarkar with randeep hooda)
आणखी वाचा : सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं 'रामसेतू'साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क
अंकिताची ही बातमी कळताच अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्वातंत्रवीर सावरकर' चित्रपटाचे पटकथा ही उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा करत आहे. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून या प्रकल्पाचे नेतृत्व करत होते. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि लंडनमध्ये होणार आहे. वीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 26 मे 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.