'दृश्यम 2' विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार 'ही' भूमिका

तब्बूचा चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. 

Updated: Oct 13, 2022, 10:28 AM IST
'दृश्यम 2' विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार 'ही' भूमिका title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 2014 साली प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ (Drishyam) चित्रपटानं तर अजयच्या चाहत्यांच्या यादी आणखी लाखो लोकांची संख्या वाढली. या चित्रपटानं प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली आहे. अजयची भूमिका आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची (Drishyam 2) प्रतिक्षा करत असताना, आता कलाकारांचे चित्रपटातीलर लूक समोर येत आहेत.  

आणखी वाचा : सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं 'रामसेतू'साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये तब्बू खूपच आक्रमक दिसत आहे कारण ती थेट दोन पोलिसांसोबत कॅमेऱ्या समोर उभी आहे. 'दृश्यम'मध्ये तब्बू एका पोलिसाच्या भूमिकेत आहे, जी तिच्या बेपत्ता मुलाचा शोध घेत असते. 

चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच अनेक चाहत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका चाहत्याने त्यावर कमेंट करत 'मोस्ट अवेटेड' असे लिहिले, तर दुसर्‍या नेटकऱ्यानं कमेंट करत 'या मास्टरपीससाठी उत्साहित' असे शेअर केले. (Ajay Devgn Drishyam 2 Tabu Is Back With Intense Expression In First Look Poster) 

अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 'दृश्यम 2' (Drishyam 2) चे दिग्दर्शन चित्रपट निर्माता अभिषेक पाठक करत आहेत. अजय हा विजय साळगावकर ही भूमिका साकारत आहे. तर तब्बू पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे.

'दृश्यम 2' ला Viacom18 स्टुडिओ, गुलशन कुमार, T-Series आणि Panorama Studios द्वारे समर्थित आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली असून संजीव जोशी, आदित्य चौकसे आणि शिव चनाना सहनिर्मिती करत आहेत. यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.