मुंबई : आज बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर झळकण्याची तयार करत आहेत. टीव्ही शोवर आपला अभिनय दाखविल्यानंतर अंकिता लोखंडे ही अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर आपला अभिनय दाखवण्यासाठी उत्सूक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बराच काळानंतर टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या आयुष्यात खूप आनंद आला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी अंकिता बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा होती. पण आता ते सत्यात उतरत आहे. अंकिता कंगणा राणावत सोबत मणकर्णिका सिनेमात काम करणार आहे. 


बऱ्याच दिवसापासून ती याची तयारी करत होती. अंकिता तिच्या भूमिकेची प्रशिक्षण घेत होती. चित्रपटात अंकिता झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे.