मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. टीव्ही विश्वातील पॉवर कपल म्हणून ओळख असलेले अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्‍की जैन (Vicky Jain) कधी आई-वडील होतील या प्रतीक्षेत त्यांचे चाहते आहेत. अनेक वेळा अंकिताला आई कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येतो. तेव्हा कायम अभिनेत्री या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता आणि विकी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाआधी देखील अंकिता आणि विकी (Ankita-Vicky) त्यांच्यात असलेल्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असायचे. आता लग्न झाल्यानंतर दोघांना सतत बाळाबद्दल (baby planning) प्रश्न विचारण्यात येतात. 


नुकताच अंकिता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासोबत 'डीआयडी सुपर मॉम्स'च्या विशेष भागामध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा जय भानुशाली अंकिताला विचारतो, 'सांगून दे सुपर मॉम (supar mom) कधी होणार आहेस?'


यावर अंकिता म्हणाली, 'मी स्वतः अजून लहान आहे...' त्यानंतर उषा म्हणतात, 'ये माझ्या मांडीवर झोप....' त्यानंतर पूर्ण सेटवर सर्वजण पोट धरून हसू लागतात. पाहा व्हिडीओ...  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंकिताने प्रोमो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. लुकबद्दल बोलायचे झाले तर ती पांढऱ्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी अंकिता आणि विकी हे दोघे विवाहबंधात अडकले.  


अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या लग्नाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही फोटोंची मालिका शेअर केली. शिवाय अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात.