अंकिता लोखंडे लग्नाच्या काही दिवसांनंतर म्हणते, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात....
अंकिता लोखंडे लग्नाच्या काही दिवसांनंतर व्यक्त केल्या भावना
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाला काही दिवस झाले आहेत. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटात दोघांनी लग्न केलं. अंकिता आणि विकीच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंकिताच्या लग्नानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर अद्यापही फोटोंची चर्चा सुरू असताना अंकिताच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
विकीसोबत काही फोटो पोस्ट करत अंकिता म्हणाली, 'मी आभारी आहे त्या रात्रींसाठी ज्यांचं रूपांतर सकाळमध्ये झालं, माझ्या आवडत्या मित्राचं रूपांतर कुटुंबात झालं, माझे स्वप्न सत्यात उतरले आहेत...' सध्या तिची ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अशी होती विकी-अंकिताची पहिली भेट
काही रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते. ब्रेकअपनंतर अंकिताने प्रवास करणं, लोकांना भेटणं, बोलणं बंद केलं होतं. पण या गोष्टींपासून स्वत:ला दूर करण्यासाठी तिने एका मित्राच्या पार्टीत एंट्री केली.
याच पार्टीत विकी जैनही उपस्थित असल्याने दोघांमध्ये ठिणगी पडली. एकमेकांना आवडले आणि हळू हळू संवाद सुरू झाला. त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यांच्या अफेअरची अफवाही आगीसारखी पसरली.
अंकिता तिचे आणि विकीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करायची. पण तिने त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. 2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला.