सुशांतबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे अंकिता लोखंडे सोशल मीडियावर ट्रोल
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर ट्रोल
मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सुशांतसिंह राजपूत (Sushant singh Rajput) बद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आहे. अलीकडे अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे, जी आता खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीचे काही भाग सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांना आवडलेला दिसत नाहीये. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अंकिताने यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.
अंकिताने इंस्टाग्रामवर म्हटलं की, मी तोंड उघडलं. मी जवळपास सगळं काही सांगितलं. माझं इतर आयुष्य कदाचित वेगळं असतं. जर मी असते. पण मी तसं केलं नाही.' अंकिता हिने केलेली ही पोस्ट सुशांतशी जोडलेली आहे. तिने यातून तिच्या ट्रोलर्सला ही उत्तर दिलं आहे. (Ankita Lokhande on mariage with sushant singh Rajput)
काही दिवसांपूर्वी अंकिताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अंकिताने असा दावा केला होता की सुशांतसिंह राजपूतच्या कारकीर्दीसाठी तिने तिच्या कारकिर्दीकडे दुर्लक्ष केले. हॅप्पी न्यू ईयर ते बाजीराव मस्तानीपर्यंत अनेक चित्रपटांना तिने नाही म्हटले आहे असे अभिनेत्रीने सांगितले आहे. तेही सुशांतसिंह राजपूतसाठी, कारण तिला त्या दरम्यान सुशांतसोबत लग्न करायचं होतं आणि करियर करायचं होतं. तर, अंकिताच्या या वक्तव्याबद्दल सुशांतचे चाहते मात्र तिला ट्रोल करत आहे.