सुशांत आत्महत्या प्रकरणी आता अंकिताची `ही` मागणी
सुशांतने राहत्या घरी गळफास घेत अखेरचा निरोप घेतला.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याचे चाहते आजही सोशल मीडियावर आक्रमक भूमिका बजावत असतात. एवढचं नाही तर सुशांतच्या आत्महत्येसाठी त्याचे चाहते अभिनेत्री अंकिता लोखंडेवर आरोप करत आहेत. त्याचप्रमाणे अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे. या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवर लाईव्ह केलं. या लाईव्ह सेसशमध्ये तिने सुशांतच्या चाहत्यांना खडेबोल सुनावले आहे.
इन्स्टाग्रामवर लाईव्हवर ती म्हणाली 'ज्या गोष्टी मला आवडतात, त्याच गोष्टी मी फॉलो करते. दुसऱ्यांच्या अकाउंटवर जावून मी कोणाला वाईट बोलत नाही. मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्याचा मला काहीही फरक पडत नाही. मात्र माझ्या आई-वडिलांना ही गोष्ट पटत नाही.' असं ती म्हणाली.
सोशल मीडियावर अनेक जण मला नको ते बोलतात. जे लोकं माझ्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांना माझ्या नात्याबद्दल काहीच माहित नाही. जर तुम्हाला एवढं प्रेम होत तर आधी आवाज का नाही उठवला. जेव्हा सर्व काही संपत होतं तेव्हा तुम्ही सगळे कोठे होता? असा प्रश्न देखील अंकिताने उपस्थित केला.
सुशांतला आयुष्यात पुढे जायचं होतं आणि तो गेला ही... तर आता माझ्यावर का आरोप केले जात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्व वेगळे असताता. तो त्याच्या आयुष्यात त्याच्या मार्गाला गेला त्यात माझी काय चूक आहे? त्यामुळे माझ्यावर आरोप करणं बंद करा. सांगायचे झालं तर, सुशांत आणि अंकिता 6 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून त्याच्या नात्यात प्रेमाचा गुलाब फुलला. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2016मध्ये ते विभक्त झाले.