अंकिता लोखंडे दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत
छोट्या पडद्यावर `अर्चना ` या व्यक्तिरेखेने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अंकिता लोखंडे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावर 'अर्चना ' या व्यक्तिरेखेने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अंकिता लोखंडे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.
कंगणा रणावत सोबत 'मणिकर्णिका' या चित्रपटातून अंकिता लोखंडे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये कंगना सोबत अंकिता लवकरच काही सीन्स शूट करणार आहे. अशी माहिती बॉलिवूड लाईफने दिली आहे. त्यामुळे अंकिताला मोठ्या पडद्यावर पाहण्याची तिच्या प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
अंकिता या चित्रपटात झलकारी बाई या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई ही वीरांगणा होती. तसेच ती राणी लक्ष्मीबाईंच्या जवळची होती. या दोघींचाही चेहरा मिळता जुळता होता. त्यामुळे दुश्मनांना धोका देणं आणि वेष बदलून हल्ला करणं सोप्पे होते. झलकारीच्या रूपातील अंकिता पाहणं देखील या चित्रपटातील खास वैशिष्ट्य ठरणार आहे.