मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. अंकिताने सुशांतच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच दिवसांनंतर ती पुन्हा आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये अंकिता देखील भावूक होताना दिसत आहे. फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये 'मला विश्वास आहे तुम्ही दोघे आता एकत्र असाल..' असं लिहलं आहे. अंकिताची ही पोस्ट पाहत अनेक बॉलिवूड कलाकारांनी आणि चाहत्यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. 



एवढचं नाही तर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने देखील कमेंट केली आहे. 'दोघे आता एकत्र असतील.. आपल्या न्याय मिळत नाही तोपर्यंत लढायचं आहे.' अशी कमेंट सुशांतच्या बहिणीने केली. दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची गर्लफ्रेंड  रिया‌ चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियापासून दूर असलेली अंकिता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीचं सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'सत्याचाच विजय होईल..' असं लिहलं होतं.