Deepa Parab Wanted To Propose Sachin Tendulkar : 'तू चाल पुढं' मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर मालिकेत अश्विनी वाघमारे ही भूमिका सगळ्यांच्या मनात जागा करण्यासाठी जबाबदार आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री दीपा परब. दीपानं अश्विनी वाघमारेची भूमिका जणू काही जिवंत केली असं म्हणायला हरकत नाही. दीपा ही लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे. अंकुश आणि दीपाचं 2007 साली लग्न झालं. त्यांच्या लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर दीपानं तिला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं याचा खुलासा केला आहे. याविषयी दीपानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. (Ankush Chaudhari's Wife) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपानं नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सचिनला प्रपोज करायचं होतं असा खुलासा दीपानं केला आहे. या मुलाखतीत दीपाला प्रश्न विचारण्यात आला की 'तुझा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता?' या प्रश्नावर उत्तर देत दीपा म्हणाली, सचिन तेंडुलकर माझा पहिला क्रश होता. मास्टर ब्लास्टरविषयी बोलताना दीपा इथेच थांबली नाही तर पुढे देखील तिला प्रश्न विचारता तिनं परत सचिनचं नाव घेतलं. पुढे दीपाला विचारलं की 'पहिलं प्रपोज कोणाला केलं होतं?' त्यावर दीपा म्हणाली, 'मला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं. मी कुणाला प्रपोज करण्याच्या आधीच अंकुशनं मला प्रपोज केलं होतं. त्यामुळे मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलं.'



दरम्यान, या आधी दिलेल्या मुलाखतीत सुखी संसाराविषयी दीपानं सांगितलं होतं. या मुलाखतीत दीपाला विचारण्यात आलं होतं की अंकुशच्या प्रेमात मुली वेड्या असताना तिनं कशा प्रकारे सुखी संसार टिकवला आणि तुमच्या नात्यात इनसिक्योरिटीची भावना आली का? त्यावर उत्तर देत दीपा म्हणाली होती की 'नाही. तुमचा जर एकमेकांवर विश्वास असेल तर तुमच्या नात्यात दुरावा येत नाही आणि इनसिक्योरिटीची भावना येत नाही. आम्ही दोघे एकमेकांना आपापली स्पेस देतो. आम्ही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. संशय करायला सुरुवात केली की ते नातं तुटतं. कोणत्याही नात्यात विश्वास महत्वाचा.'


हेही वाचा : दमदार अॅक्शन अन् ग्लॅमरचा तडका! Priyanka Chopra ची सिटाडेल ठरली जगातील नंबर 1 वेब सीरिज


दीपा आणि अंकुश यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. दीपानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, मुलाच्या जन्मानंतर दीपानं अभिनयातून ब्रेक घेतला आणि त्याच्या बऱ्याच वर्षांनंतर दीपानं पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदारर्पण केले. पण यावेळी दीपानं मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर परतली आहे.