मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित 'गुलाबी' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी तिघींची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे यात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार हे नक्की ! सध्या तरी पोस्टरवरून आपण इतकाच अंदाज बांधू शकतो. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, '' आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.''


श्रुती मराठेने एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं की, विचारांचा, वागणुकीचा, स्वप्नांचा आणि नात्यांचा 'गुलाबी' प्रवास ! 'गुलाबी' चित्रीकरण सुरु..!


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांना श्रुतीच्या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं की, अरे या तर रंभा, उर्वशी, मेनका. तर अजून एकाने लिहीलंय, खुप छान अनेक शुभेच्छा.  अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या पोस्टवर करत आहेत. 


हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम  नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती. त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली. यांनंतर पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली. पुढे महिला दिन जागतिक पातळीवर साजरा होवू लागला.