मुंबई : 'सारेगमप' ची जुनी परंपरा मोडत ह्या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रथमच हा महाअंतिम सोहळा वेगळ्या पद्धतीने आकार घेत आहे. ह्या रविवारी म्हणजेच ७ जानेवारी ला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा “लाईव्ह” रंगणार आहे. ह्यातूनच आपल्याला ह्या पर्वाचा "पंगेखोर" महाविजेता मिळणार आहे, महाविजेत्याला मिळेल ५ लाखाचे बक्षिस, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी. तसेच “द्वितीय क्रमांका” ला मिळतील ३ लाख रुपये, आणि “तृतीय क्रमांका” ला मिळतील २ लाख रुपये, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी.


सोबतच या महाअंतिम सोहळ्याला पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर आणि हृषिकेश जोशी यांसारख्या कानसेन कलाकारांची उपस्थित असणार आहे. जसं आपण न्यूज चॅनेलवर एक्झिट पोल बघतो त्याचप्रमाणे इथे देखिल या कलाकारांचं स्पेशल पॅनल असणार, जे आपल्याला अधूनमधून भेटत महाअंतिम सोहळ्याच्या निकालावर प्रकाश टाकणार आहेत. या आगळ्यावेगळ्या पॅनलचं सूत्रसंचालन करणार आहे प्रियदर्शन जाधव.



ह्या सोहळ्यात "रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे" ह्या परीक्षकांसोबत "अन्नु कपूर” हे विशेष परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. "अक्षय कुमार" हे देखील सारेगमप महाअंतिम सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मग तयार आहेत ना ह्या महाअंतिम सोहळ्याचे लाईव्ह साक्षीदार व्हायला, पाहायला विसरूनका "सारेगमप घे पंगा कर दंगा" चा महाअंतिम सोहळा रविवार ७ जानेवारी २०१८, दुपारी १२ वा. पासून लाईव्ह आपल्या झी मराठी आणि झी मराठी HD वर.